नायगाव तालुका मराठी पत्रकार संघच्या वतीने आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
नायगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना सूचित करण्यात येते की दरवर्षी प्रमाणे 6 जानेवारी 2023 रोज शुक्रवार दुपारी १२.३० वा एम आय.डी.सी. कुष्णुर ता.नायगाव येथील समाधान रिसॉर्ट येथे दर्पण दिन कार्यक्रम व संवाद बैठकीचे आयोजन नायगाव तालुका मराठी पत्रकार संघा च्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे मा.जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पांडे मांजरमकर यांचे मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार असून. बैठकीस जेष्ठ पत्रकार वाहबुद्दीन शेख, माजी ता. अध्यक्ष माधव मामा कोकुरले, एस.एम. मुदखेडकर, भूषण पारळकर, भा.ग.मोरे, बालाजी नागठाणे, राजेश कुलकर्णी, विकास भूरे, बी.आय. बडुरे, बळवंत जाधव, वसंत जाधव, यांची उपस्थितीती राहणार आहे
याच वेळी नायगाव सारख्या ग्रामीण भागात राहून वृत्तपत्र चालवणारे संपादक युगांतर रघुनाथ सोनकांबळे ,दलित कैवारी प्रकाश भाऊ हाणमंते, नायगाव फास्ट न्यूज संपादक माधव पवार रुईकर पत्रकार साहित्यीक -शाहीर माधव बैलकवाड यांचा सत्कार व सन्मान होणार आहे.या बैठकीस उवस्थित राहण्याचे आवाहननागेश पाटील कल्याण तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी मराठी पत्रकार संघ नायगाव यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा