पहिल्या चित्रपटाप्रमाणेच ' वेड ' ला ही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रितेश आणि जेनेलिया यांच्या ' तुझे मेरी कसम ' या एकत्र चित्रपटाला तीन जानेवारी रोजी वीस वर्षे पूर्ण होत आहेत. जे वेड मजला लागली तुजलाही ते लागेल का ? असं खरंतर नवीन प्रेमात विचारायचं असतं. परंतु रितेश आणि ज्यांनी लिहा या दोघांनाही हे वेड वीस वर्षांपूर्वीच लागलं होतं, त्यांच्या एकत्र काम केलेल्या ' तुझे मेरी कसम ' या पहिल्या चित्रपटात चक्क वीस वर्ष पूर्ण झाली. पण वेळ मात्र कमी झालं नाही. चित्रपट तयार होतच राहिली. बघता बघता मराठी चित्रपट निर्मितीच्या वेडा न झपाटलं आणि याचं वेडापोटी मुंबई फिल्म कंपनी सुरू झाली, तिलाही चार जानेवारीला दहा वर्षे पूर्ण होत आहेत.
चित्रपट हे दोघांचंही कार्यक्षेत्र असल्यामुळे आणि मधल्या काळात अनेक दिग्दर्शकांच्या सोबत काम करत असताना या क्षेत्रातलं महत्त्वाचं असं दिग्दर्शन करून बघावं. अशी रितेशची इच्छा असणं स्वाभाविकच आणि त्यात त्याची सहचरणी म्हणून जेनेलिया सामील होतीच. या वेडानं यश तर दिलंच, पण आपण हे देखील करू शकतो हे सिद्ध झालं. आता वीस वर्षांपूर्वी एकमेकांसोबत पदार्पण केलेली ही जोडी ' वेड ' या नव्या कोऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला भेटायला आली आहे.
यात रितेश यांचा डबल रोल अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून आहे तर जेनेलिया अभिनेत्री आणि निर्माती अशा डबलरोल मध्ये आहे. मराठी चित्रपटाच्या क्षेत्रात महत्त्वाचा अनुभव आणि प्रेक्षकांना खेळवून ठेवणारा असे असा हा डबल धमाका ' वेड ' च्या रूपाने रितेश आणि जेनेलिया यांनी साकार केला आहे. वेड हे केवळ प्रेमाचे नसते तर काही प्रकारच्या वेडा प्रेमाच्या स्पर्शाने दोघेही एका भूंगीत असतात. तर आणखी एका प्रकारात खिल्लारपणाच्या ऐवजी स्थिरता आणि म्हणून शांतता असते.हीच कथा ' वेड ' मध्ये गुंफली गेली आहे.
महत्वाकांशी तरूण प्रेमात पडणं नवीन नसेल, पण हे प्रेम त्यांच्या जिवनाला जी कलाटणी देते ती प्रत्यक्ष पडद्यावर बघून च अनूभवावी अशी आहे आणि अशी कथा साकार करणे कठिण आहे.त्यासाठी वेडे व्हावेच लागेल.या ठिकाणी प्रेक्षकांना एक महत्त्वाचची बाब जाणवणार आहे आणि ती म्हणजे या चित्रपटात रितेश आणि जेनेलिया हे दोन अनूभवी कलाकार वीस वर्षानंतर पती-पत्नीच्या रूपात आपल्याला एक मनोरंजक कथा उलगडून दाखवणारं आहेत . त्यामधून चित्रपटाच्या प्रत्येक क्षेत्रात या दोघांच्याही कामाची व्यापक ओळख होणार आहे. रितेश पती आणि दिग्दर्शक जेनेलिया पत्नी आणि अभिनेत्री यांच्यामधला समन्वय प्रेक्षकांना वेड्याची नवी व्याख्या करावी मात्र नक्की.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा