पैशा ऐवजी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (राज सारवडे)
मंगळवेढा शहरात 2008 साली पहिला मास्टर प्लॅन आला त्यात अनेक नागरिक बेघर झाले. तोही सद्यस्थितीला अर्धवट असल्याचे बोलले जात आहे. आता दुसरा मास्टर प्लॅन लादला जात असून या नवीन विकास आराखड्याच्या निषेधार्थ मंगळवेढा आज बंद ठेवण्यात येणार आहे.
पहिल्या मास्टर प्लॅन मध्ये ज्या नागरिकांची घरे, दुकाने गेली आहेत त्यांना प्रशासनाने बेघर केले त्यांना अत्यंत तोडकी मदत माथी मारली होती त्यातील काहीजण न्यायालयात दाद मागण्यासाठी गेले आहेत. अशा लोकांना प्रशासनाने पैशा ऐवजी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
मंगळवेढा व्यापारी महासंघाच्यावतीने प्रस्तावीत शहर विकास आराखडा रद्द करावा याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा नगराध्यक्ष यांना आज देण्यात येणार आहे.मंगळवेढा शहराकरीता जो प्रस्तावित विकास आराखडा आहे त्यास तमाम नागरिक व व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे.
जेथे एकही वाहन जात नाही अशा ठिकाणी १२/१५ मीटर रस्ता प्रस्तावित केला करता आहे, ज्या रस्त्याचे केवळ बाजूस नगरपालिकेच्या मिळकती आहे. त्या सोडून बाजूच्या खाजगी मिळकती पाडण्याचे आयोजन आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा