उदगीर येथे समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न
शिवशाही वृत्तसेवा (नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
सुदर्शन बोराडे यांनी समाजात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून श्रीमठाच्या (लातूर) वतीने सुदर्शन बोराडे यांना समाजभूषण पुरस्कार व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.आज छत्रपती संभाजी नगर येथील बैठकीला आले असता स्थानिक बांधवांनी त्यांचा समाज भूषण पुरस्कार मिळाल्या निमित्त सत्कार केला. यावेळी छत्रपती संभाजी नगर येथे बैठकीला उपस्थित असलेल्या मान्यवरांची स्नेहभेट घेतली.
संजय भाऊ बोराडे व सहकारी यांना परभणी येथील कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रण या वेळी देण्यात आले. समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबदल महाराष्ट्राचे ओबीसी महासंघ उपाध्यक्ष बालाजी सुवर्णकार राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार घुले . दर्शना ताई घुले मोहनजी पोद्दार राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख जफार खान शेख सुभाष तगाळे सुधाकर रावजी दापकेकर प्राध्यापक अतिश यांनी विशेष अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा