आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
शंभू महादेवाला नारळ फोडून निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात होणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील मौजे रांझणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाच्या सौ. रेश्माताई बंडू शिंदे - पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
निवडीनंतर रांझणीच्या नुतन सरपंच सौ. रेश्माताई शिंदे -पाटील यांचा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला.श्री शंभू महादेव यांच्या पावन झालेल्या रांझणी गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि धोरणात्मक विकासासाठी कोणताही राजकीय गट - तट यांचा आकस न ठेवता जनतेच्या सर्वसमावेशक मूलभूत आणि पायाभूत सुविधांसाठी आपल्या पदाचा व अधिकाराचा वापर करा अशी अपेक्षा यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केली.
पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये आपल्या सेवाभावी नेतृत्व कौशल्याने विकासपुरुष असा लौकिक असणाऱ्या आ.आवताडे यांच्या पाठीशी उभे राहून कोणाच्या ही राजकीय आमिषाला व अफवांना बळी न पडता आम्ही आमदार आवताडे यांच्याच नेतृत्वाखाली आमची राजकीय वाटचाल सक्षमपणे पुढे चालू ठेवू असा विश्वास मिस्टर सरपंच तथा युवक नेते राजाराम उर्फ बंडू शिंदे पाटील यांनी व्यक्त केला.यावेळी राजाराम उर्फ (बंडू) पाटील,दादा घायाळ, मा.सरपंच संभाजी कांबळे,योगेश चौगुले,विष्णू घायाळ, नितीन घोडके,शंकर शिंदे, आण्णासो आवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा