डिसेंबर जानेवारी महिन्यात सहलीचा उत्साह
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( प्रतिनिधी - शिवाजी कुंटूरकर )
नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दहावी वर्गातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद येथील विविध ठिकाणाचे पर्यटन स्थळाचा शैक्षणिक सहलीमध्ये आनंद घेतला शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी काढलेले या सहलीत विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने खेळण्याचा आनंद घेतला.
तसेच याबरोबर येथील स्थळांची ऐतिहासिक माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. त्याचबरोबर एपीजे अब्दुल कलाम वैज्ञानिक संशोधन केंद्र औरंगाबाद येथे त्यांनी भेट देऊन आपल्या अभ्यासातील काही टिप्स घेऊन आपल्या अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण माहिती गोळा केली
त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा देखील आनंद घेतला. या सहलीमध्ये नियोजन जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कुंटुर शाळेचे मुख्याध्यापक संजय राजपूत सर , बाबुराव बावने शिक्षक यांनी केले तर यावेळी विद्यार्थ्यांनी दौलताबाद येथील देवगिरी किल्ला त्याचबरोबर भुवनेश्वर मंदिर पर्यटन स्थळ विविध ऐतिहासिक स्थळे पौराणिक वास्तु प्राचीन व मंदिरे आधुनिक मंदिरे, प्राणी संग्रहालय ,तसेच वाटर पार्क ,वेरूळ अजंठा लेणी ,ची सर्वत्र माहिती घेऊन हे शैक्षणिक सहल पार पडली,
प्रथम एक पी जी अब्दुल कलाम वैज्ञानिक संशोधन केंद्र औरंगाबाद ,वेरूळ अजिंठा , देवगीरी दौलताबाद किल्ला तसेच वाटर पार्क दौलताबादचा देवगिरी किल्ल्याचा बी बी का मकबरा ऐतिहासिक पावन चक्की , वॉटर पार्क या ठिकाणी भेटी देऊन सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्सुक सहभागी होऊन सहलीचा आनंद घेतला सर्व पालकांनी देखील उत्सुकपणे आपल्यास पाल्यांना सहभागी करून त्यांना विविध ठिकाणी भेट देण्याचा आनंद मिळवून दिला .
सहलीच्या यशस्वी साठी कुंटूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक व माध्यमिक शाळा कुंटुर सहशिक्षक विठ्ठल सिंह चव्हाण , शिक्षक बाबुराव बावने, शिक्षिका वर्षा गायकवाड मॅडम, शिक्षक मोरे सर , अरुण अनिल कांबळे ,समिर कल्यापुरे, विवेक कदम, पवन देवघरे, आयुष झगडे ,अरुण अनिल कांबळे, अनिकेत कमळे, इत्यादी विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा