पालखीमध्ये राष्ट्रीय ग्रंथ म्हणून भारतीय संविधानाची प्रत
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेच्या छात्रोत्सव 2023 या कार्यक्रमास आज प्रारंभ झाला. ग्रंथदिंडी व शोभायात्रा यांच्या माध्यमातून पहिले पुष्प सादर करण्यात आले. या ग्रंथ दिंडीमध्ये भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या धार्मिक ग्रंथा बरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या भारतीय संविधानाचाही समावेश करण्यात आला होता. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असणाऱ्या विविध पोशाख, भाषा, संस्कृती, खेळ यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रीय महापुरुष, राजकीय नेते, संत, यांच्या वेशभूषा केल्या होत्या. त्यातून थोर महापुरुषांच्या स्मृतींना यातून उजाळा देण्यात आला.
लेझीम, ढोल, दांडपट्टा,लाठी यासारख्या मर्दानी खेळाचे ही आयोजन करण्यात आले होते. प्रशालेतील 1500 विद्यार्थी या शोभायात्रेत सहभागी झाले होते. प्रारंभी शोभा यात्रेचे उदघाटन पंढरपूर शहराचे पोलीस निरीक्षक मा. श्री अरुण फुगे साहेब, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता श्री. तुषार होनमाने साहेब यांनी केले. यावेळी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. नाना मालक कवठेकर, चेअरमन विनाताई जोशी, सचिव एस. आर. पटवर्धन सर, पदाधिकारी डॉक्टर अनिल जोशी, डॉक्टर मिलिंद जोशी, श्री एस. पी. कुलकर्णी सर, श्री ऋषिकेश उत्पात, श्री संजय कुलकर्णी मुख्याध्यापक श्री व्ही. एम. कुलकर्णी सर, उपमुख्याध्यापक श्री. आर. जी. केसकर सर, पर्यवेक्षक श्री एम. आर. मुंढे सर, एस. आर. कुलकर्णी मॅडम, कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.वाय.पाटील सर, पर्यवेक्षक सौ.सीमा चिंचोळकर मॅडम शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने होते.
पंढरपूर मध्ये प्रथमच संविधानाची पालखीतून शोभायात्रा निघाल्याचे पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला. प्रशालेतील क्रीडा विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री.राजेश धोकटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले. सहभागी 1500 विद्यार्थ्यांना विठ्ठल मंदिर मनीषा नगर येथे श्री. राहुल हाके मित्र परिवाराच्या वतीने शुद्ध पाणी बॉटल व खाऊवाटप करण्यात आले यावेळी पत्रकार श्री महेश खिस्ते, श्री.सुनील उंबरे, श्री.विरेंद्र उत्पात,श्री.उत्तम अभंगराव श्री.सचिन कुलकर्णीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा