कन्नड तालुक्यातील करंज खेड येथील घटना
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड ( प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे ) औरंगाबाद
कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे हातपाय बांधलेल्या अवस्थेत सोमवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. आनंदा नामदेव मसुरे वय 45 राहणार चिमणापूर हल्ली मुक्काम करंजखेडा असे मृत व्यक्तीचे नाव आहे आनंदा मसुरे हे करंजखेडा येथे घर जावई म्हणून सासू , पत्नी दोन मुले यांच्या सोबत राहत होते.
सासरवाडीत त्यांना पाच एकर जमीन आहे. रविवारी रात्री दोन्ही मुलांनी मसुरे यांच्या सोबत शेतात एकत्र जेवण केले. रात्री घरी पाठवले ते स्वतः शेतात झोपण्यासाठी थांबले सकाळी पत्नी व मुलगी शेतात गेली असता तिथे मसुरे आढळून न आल्याने त्यांनी त्यांचा शोध घेतला दुपारी एक वाजता दोघींना गट क्रमांक 640 मध्ये स्वतःच्या शेतातील विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला माहिती मिळाल्यावर खळबळ उडाली पोलीस पाटील दिलीप वाघ यांनी पिशोर पोलिसांना याविषयी माहिती दिली.
पोलीस हेड् कॉन्स्टेबल सोपान टकले वसंत पाटील यांनी भेट दिली तरुणाच्या मदतीने हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृत्यू देह बाहेर काढण्यात आला. आनंदा नामदेव मसुरे यांच्या पश्चात पत्नी, सासू दोन मुले, मुली असा परिवार आहे पोलीस हेड्स कॉन्स्टेबल सोपान टकले हे पुढील तपास करीत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा