सावित्रीबाई फुलें यांच्या प्रतिमेचे पुजन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मा.व उच्च मा.विद्यालय कुंटूर येथे आज दि.3 जानेवारी 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील एम.व्ही होते प्रमुख वक्त्या म्हणुन जि.प हा.कुंटूर येथील सौ.लव्हेकर मॅडम या होत्या सर्वप्रथम सावित्रीबाई फुलें यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले . सर्व वर्गातील विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त केले व प्रा.शिंदे सर यांनीही आपले विचार मांडले सौ.लव्हेकर मॅडम यांनीही सावित्रीबाई फुले जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी अध्यक्षीय समारोप श्री पाटील सर यांनी केले याप्रसंगी लो.प्रा.शाळेच्या सौ.भांड बाई ,आरोग्य विभागाच्या महीला कर्मचारी सौ.भाग्यश्री मॅडम,तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी ,विद्यार्थीनी उपस्थितष होते .सुत्रसंचलन इ.8वी च्या वर्गातील मुंलीनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पांडे सर ,सौ.नव्हारे यांनी परीश्रम घेतले.व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा