maharashtra day, workers day, shivshahi news,

सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वप्ना दुर्वे यांच्या समवेत विद्यार्थ्यांनी साजरा केला स्री मुक्तीदिन

शालेय विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाबरोबर महापुरुषांची चरित्रे अभ्यासावी - सत्यशोधक रघुनाथ ढोक

stree mukti din, actor swapna durve, vavarhire, dahivadi, satara shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नातेपुते

शालेय पाठ्यपुस्तकातील अभ्यासाबरोबरच महापुरुषांची चरित्रे वाचून आपले विचार समृद्ध करावे असे प्रतिपादन फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ ढोक यांनी केले ते वावरहिरे येथे क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्त बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मोबाईल व सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती कमी होत चालली असून विद्यार्थ्यांनी विविध विषयांच्या ग्रंथांचे वाचन करायला हवे.विज्ञान तंत्रज्ञान तसेच जीवनास आवश्यक असणाऱ्या ज्ञानाबरोबर महापुरुषांचे चरित्रही वाचावयास हवे. 

सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा जोतीराव फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या अर्ध पुळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक हणमंतराव अवघडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

यावेळी अभिनेत्री स्वप्ना दुर्वे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांनी भारतात प्रथम मुलीसाठी शाळा सुरू केली त्यास 175 वर्ष पूर्ण झाली म्हणून वावरहिरे प्राथमिक शाळेस 175 महापुरुषांचे ग्रंथ भेट देण्यात आले त्याचा स्वीकार मुख्याध्यापक अवघडे सर यांनी केला.

अभिनेत्री स्वप्ना दुर्वे यांनी महात्मा जोतीरव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रसंग सांगितले तसेच अभिनय कसा केला जातो याचे मार्गदर्शन करून शालेय अभ्यासाबरोबर एक कला अवगत करावी असे सागून मालिकांमधील प्रसंग, प्रात्यक्षिके हुबेहूब करून दाखवली. अभिनेत्री स्वप्ना दुर्वे यांच्या आगमनामुळे शालेय विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे समक्ष मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मनसोक्त नाचून,हसून ,संवाद सादत आनंद व्यक्त केला. यावेळी अभिनेत्री स्वप्ना दुर्वे व सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा शाळेत भेट दिली त्याचा स्वीकार मुख्याध्यापक श्री हणमंतराव अवघडे यांनी केला.

तालुकास्तरावर विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव अभिनेत्री स्वप्ना दुर्वे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाल श्रीफळ व ग्रंथ देऊन करण्यात आला. गीतमंच विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन सुंदर केल्याने अभिनेत्री दुर्वे यांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. डॉक्टर अमोल भिसे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर मौलिक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद बडवे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सुनिता खरात, रेखा दाभोळे ,मनीषा साबळे यांनी परिश्रम घेतले यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठे संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !