भुयारी मार्गाच्या बांधकामाचे एस्टीमेट ५ कोटी ६५ लाख
शिवशाही वृत्तसेवा , बुलढाणा ( जिल्हा प्रतितिनिधी प्रतीक सोनपसारे )
शेगाव शहरातील रेल्वेगेट बाहेरील भागात राहणाऱ्या नागरिकाना पायदळ ये जा करण्यासाठी नितांत गरज असलेल्या रेल्वेखालच्या भुयारी मार्गाचे एस्टीमेट तयार करण्यासाठी आ. डॉ. संजय कुटे यांनी आक्रमक भूमिका घेत तांत्रिक अडचणी दूर करून तात्काळ मुयारी मार्गाचा प्रश्न दूर करण्याबाबत सूचना केल्या होत्या त्याचा परिणाम लगेच दिसून आला असून मुयारी मार्गाचे एस्टीमेट तयार झाले आहे.
भुयारी मार्ग निर्माण कृती समितीच्या सदस्यांना विश्वसनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाच्या आवारातील भुयारी मार्गाच्या बांधकामाचे एस्टीमेट ५ कोटी ६५ लक्ष रूपयाच्या आसपास झाल्याचे सांगण्यात आलं आहे, तर रेल्वेखालच्या भुयारी मार्गाला धनगर नगर व बालाजी फैलाच्या बाजूने जोडण्यासाठी लागणाऱ्या जोडमार्गासाठी जवळपास २.५ कोटी रूपये लागतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
तसेच उडाणपूलाचा पिल्लर मजबूत करण्याच्या कामासाठीचे एस्टीमेट सुध्दा तयार करण्यात आल्याचे समजते. भुयारी मार्ग निर्माणासाठी बनलेल्या कृती समितीच्या माध्यमातून ९ डिसेंबर २०२२ रोजी आ डॉ संजय कुटे याना भुयारी मार्ग निर्मितीसंदर्भात निवेदन देण्यात आले होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा