रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी होणार मराठा वधू वर परिचय मेळावा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील मराठा सेवा संघाच्या वतीने सलग दुसर्या वर्षी साई तीर्थ मंगल कार्यालय शेळगाव रोड नायगाव येथे भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात मोठ्या संख्येने यंदा कर्तव्याच्या दृष्टीने उत्सुक मराठा वधू वर व त्यांचे नातेवाईक यांनी सहभागी होण्याचे आव्हान आयोजक नायगाव तालुका मराठा सेवा संघाचे वतीने करण्यात आले आहे.
मुलं वयात आली आणि उद्योग व्यवसायात रमली की; पालकांचा शोध त्यांना जोडीदार शोधण्यासाठी सुरू होतो. पण हल्ली माणसाकडे आपल्या उद्योग व्यवसाय नौकरीतील धकाधाकीच्या व धावपळीच्या जीवनात माणसाना वेळ ही अमूल्य गोष्ट झाली आहे. या सर्व अडचणी दूर करून समाज बांधवांनां एका व्यासपीठाखाली आणून त्यांचा जोडीदार शोधण्याचा मार्ग सोयीस्कर करण्याच्या या एकमेव उदात्त हेतूने मराठा सेवा संघ नायगाव च्या पुढाकारातून प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी भव्य मराठा वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पवळे, सचिव संतोष कल्याण, कार्याध्यक्ष देवीदास जाधव, आनंद पवार, कोषाध्यक्ष नारायण शिंदे, उपाध्यक्ष गंगाधर चव्हाण, सहसचिव नागेश पाटील कल्याण, संघटक टी.जी. रातोळीकर, उद्धव ढगे सौ. सुजाता शिंदे शिवराज काठेवाड, विजय नरवाडे, पि. ए. भोसले, सुरेश बार्हळे,सदाशिव आगलावे, हणमंत जाधव, यांच्या पुढाकारातून व डाॅ. विश्वास पाटील चव्हाण, डॉ. दत्तात्रय शिंपाळे,एम. जे. कदम, व्ही.सी.जाधव, उत्तम शिंदे, जी. एम. शिंदे, विजय पाटील जाधव यांचे सल्ला व मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या वधू वर परिचय मेळाव्याचा जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपल्या पाल्यांना यात सहभागी करून घेऊन लाभ घेण्याचे आव्हान नायगाव तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा