मा.आ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नांना यश
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यापासून माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सिंदखेड राजा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणत आहेत. त्यात आणखी भर पडली असून, २० कोटी २४ लाखांचा विकास निधी खेचून आणला.
बालाजी महाराज पालखी बैठक व आमनानदी सौंदर्यीकरण व विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत देऊळगाव राजा नगर परिषदेस २० कोटी २४ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. या पूर्वी हा निधी सिंदखेड राजा नगर परिषदेसाठी मंजूर करण्यात आला होता. मात्र त्या ठिकाणी जागा उपलब्ध न झाल्यामुळे हा निधी अन्यत्र न वळवत हा देऊळगाव राजा नगर परिषदेकडे वळविण्यात यावा, यासाठी खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. हा निधी वळण्यात त्यांना यशही आले. देऊळगाव राजा नगर परिषदेकडे हा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे देऊळगाव राजा शहराच्या विकासात आणखी भर पडणार आहे. निधी मंजूर केल्याबद्दल शहरवासीयांनी शशिकांत खेडेकर यांचे आभार मानले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा