स्मशान भूमी व भवन जागा उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
तृतीयपंथी लोकांना नरसी येथील गट क्रमांक 271 मधील जागेत स्मशान भूमी व भवन जागा उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती त्या प्रस्तावास लवकरच आपण मंजुरी करून जागा उपलब्ध करून देऊ आपण याबाबत प्रयत्नशील असल्याचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी निवेदनाला उत्तर दिले.
कमल फाउंडेशन च्या वतीने तृतीयपंथी लोकांना हक्काची स्मशानभूमी व भवन उपलब्ध व्हावे या मागणीचे निवेदन तहसीलदार गजानन शिंदे यांना देण्यात आले तसेच नरसी येथील सरपंच ग्रामसेवक यांना देखील निवेदनाद्वारे सदर मागणी कळविण्यात आलेली होती तेव्हा तहसीलदार गजानन शिंदे साहेब यांनी तृतीयपंथी लोकांच्या मागणीला लवकरच आपण मंजुरी उपलब्ध करून देऊ असा विश्वास दाखवून दिला तर तृतीयपंथी लोकांचे निवेदन नरसी येथील सरपंच ग्रामसेवक यांना देण्यात आले यावेळी निवेदनावर तृतीयपंथी गुरु शानुर बाबू बकस, फरीदा शानुर बकस, शकीला फरीदाबक्कस ,राधा फरीदा बक्कस, शिल्पा फरीदाबक्कस, रूपा फरीदाबक्कस यांनी निवेदन देऊन निवेदनावर स्वाक्षऱ्या केले आहेत.
कमल फाउंडेशनच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून तृतीय पंथीच्या ज्वलंत मागण्या मंजूर करण्यासाठी शासन दरबारी अनेक निवेदने दिली असून त्या मागणीची दखल न घेतल्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण व मोर्चा काढून शासन दरबारी ही मागणी लावून धरली होती स्थानिक स्तरावर शासन प्रतिनिधी तहसीलदार गजानन शिंदे यांनी या मागणीला लवकरच आपण मंजुरी करून देण्याबाबत प्रयत्नशील आहोत असा आशावादी व्यक्त केला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा