कमल फाउंडेशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील मौजे नरसी ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जमीन गट क्रमांक 271 मधील जागा तृतीयपंथी यांना स्मशानभूमीसह भवन उपलब्ध व्हावे यासाठी ती जागा देऊन ऐतिहासिक निर्णय घ्यावा अशी कमल फाउंडेशनच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
भारतीय संविधानाने सर्व घटकातील लोकांना समान हक्क व न्याय दिलेला आहे अनेक महिला पुरुषांना विविध योजनेचा लाभ मिळत असला तरी तृतीयपंथींना पण कुठलीच योजना व लाभ मिळत नाही त्यांना स्वतःचे हक्काचे भवन उपलब्ध व्हावे आणि समशानभूमीसाठी जागा उपलब्ध व्हावी या उदात भावनेने गेल्या अनेक वर्षापासून कमल फाउंडेशनच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
नायगाव तालुक्यातील मौजे नरसी ग्रामपंचायत हद्दीतील जमीन गट क्रमांक 271 मधील जागा तृतीयपंथीना भवन व स्मशानभूमीसाठी मिळावी अशी मागणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कमल फाउंडेशन च्या वतीने करण्यात आलेली आहे
या निवेदनावर तृतीयपंथीचे गुरु शानुर बाबू बकस यासह शकीला फरीदाबक्कस शिल्पा फरीदाबक्कस फरीदा शानुर बक्कस राधा फरीदा बकस आणि कमल फाउंडेशनचे अमरदीप दिगंबर गोधनी अध्यक्ष कमल फाउंडेशन नांदेड तथा युवा तृतीयपंथी राष्ट्रीय कार्यकर्त्या यांनी जिल्हाधिकारी सह पालकमंत्री गिरीश महाजन, उपविभागीय अधिकारी नायगाव, व तहसीलदार नायगाव यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा