अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रातील विकास योजनांसाठी ७५ लाख रुपये निधी मंजूर - आ. समाधान आवताडे

अल्पसंख्यांक नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी निधी

75 lakh rupees sanctioned for development schemes in minority dominated rural areas, mla samadha autade, mangalwedha, pandharpur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर 

मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्यांक लोकसमूहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघातील अल्पसंख्यांक लोकसमूहाच्या विकासासाठी ७५ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. सामाजिक प्रगतीच्या सोयी - सुविधांची चौकट परिपूर्ण करण्यासाठी आमदार आवताडे यांनी दलित व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी नुकताच चार कोटी रुपयांचा निधी मतदार संघामध्ये मंजूर करून घेतला आहे. त्यानंतर लगेचच अल्पसंख्यांक जनतेच्या विकासासाठी सदर निधी मंजूर झाल्याने आमदार आवताडे यांच्या कार्याची पद्धत मतदारसंघांमध्ये ठळकपणे दिसून येत आहे.

पंढरपूर तालुक्यातील गावे व कामे 

तावशी येथील मुस्लिम कब्रस्तान येथे संरक्षक भिंत बांधणे, कासेगाव येथे महामाया देवी शेजारी दर्गा येथे पेव्हर ब्लॉक बसवणे, कासेगाव मठ वस्ती मदारसाहेब दर्गा येथे पेवर ब्लॉक बसविणे, कौठळी बालेपीर परिसर येथे सभामंडप व सुशोभीकरण करणे

 मंगळवेढा तालुक्यातील गावे व कामे 

ब्रह्मपुरी येथील मुस्लिम स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधणे, सिद्धापूर येथील मुस्लिम दफनभूमी सुशोभीकरण करणे, सोड्डी येथील मुस्लिम स्मशानभूमी शेड व संरक्षक भिंत बांधणे, आंधळगाव येथील मुस्लिम समाज मुलाणी गल्ली येथे मज्जित समोर सभा मंडप बांधणे, नंदुर येथील गैबीपीर देवस्थान शेजारी सभा मंडप बांधणे, कात्राळ येथील मुस्लिम समाज येथे पाणीपुरवठा करण्यासाठी बोर मारून मोटर बसवणे व हौद बांधणे.

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार समाधान आवताडे यांनी अल्पसंख्यांक विकासाच्या अनुषंगाने मंजूर केलेला हा निधी म्हणजे विकासाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या मुस्लिम समाजाला पुन्हा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी असलेली खूप मोठी व्यापक तरतूद आहे. आमदार आवताडे यांच्या राजकीय कारकीर्दीपासून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा मुस्लिम समाज अशा विधायक विकास कार्यामुळे आमदार आवताडे यांना यापुढेही मोठी ताकद देईल
-रसुल मुलाणी     
मिस्टर सरपंच, सिद्धापूर     

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !