जीवन विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिक सोनपसारे)
जीवन विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दुसरबीड येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी भारत स्काउट गाईडचे जिल्हा सचिव श्री आर.यु.शिंगणे सर, CRPF मध्ये असलेले सुशील चव्हाण, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुकूंदराव देशमुख, उपाध्यक्ष किसनराव बाप्पू देशमुख, दिपक जोगडे, सागर सांगळे, पोलिस पाटील सचिन मखमले, माजी शिक्षक पठाण सर, म्हस्के सर, डाॕ शिवाजी खरात व अन्य प्रमुख अतिथी व ईतर मान्यवर ऊपस्थित होते. २४ व २५ जानेवारी पासुन वार्षीक स्नेहसंमेलन आयोजीत करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांचे विवीध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाले. आज प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या वेळी प्राचार्य भांगे सर व स्नेहसंमेलन प्रमुख जि.ओ. देशमुख व सर्व शिक्षक वृंद यांनी परीश्रम घेतले सुत्रसंचलन डी.जी. राजे जाधव सर यांनी केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा