जीवन विकास विद्यालय व कनिष्ठ महविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा ( प्रतीक सोनपसारे )
पारंपरिक महिलांचे जीवन व आधुनिक महिलांचे जीवन यामध्ये खूप मोठे अंतर पडले असून मातांनी मुलींच्या संस्कारा कडे लक्ष द्यावे व मुलींनी स्वतः ला अबला न समजता सबला म्हणून वावरावे असे प्रतिपादन डॉ. सौ शिल्पा ताई कायंदे यांनी केले. दुसरबीड येथील जीवन विकास विद्यालय व कनिष्ठ महविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या मातृसंमेलनाच्या सत्रात त्या मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनगाव राजा सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. सरस्वती ताई वाघ तर यावेळी शिवश्री सौ. ज्योतीताई राजे जाधव सौ. प्रणिताताई गजेंद्र देशमुख, श्रीमती कोकिळाताई गवई ,सौ प्रज्ञाताई राजे जाधव, दुसरबिड नगरीच्या सरपंच ज्योतीताई सांगळे, पोलीस पाटील सौ.उर्मिलाताई मखमले यांची प्रमुख उपस्थिती होती .पुढे बोलताना डॉ. सौ.शिल्पा कायंदे म्हनाल्या महिलांनी स्वतः ची व आपल्या मुलींची शारीरिक व्याधिंची काळजी घेऊन आपला उत्कर्ष साधण्याचेही आवाहन केले. जीवन विकास विद्यालयात दिनांक २४,२५, व २६ जानेवारी रोजी वार्षिक स्न्हेसंमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात मातृ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती होती प्रास्ताविक सौ. उज्ज्वला देशमुख यांनी केले तर सूत्रसंचलन श्री. ज्ञानेश्वर राजे जाधव यांनी केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा