मराठा सेवा संघाच्यावतीने वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
इतर समाजात वधू वर परिचय मेळावे होतात. पण आपला समाज संख्येने मोठा असल्याने काळानुसार आपल्याही समाजात वधू वर परिचय मेळावे घेणे गरजेचे आहे. पण या मेळाव्याचे खरे सार्थक यंदा किमान 11 सामूहिक विवाह संपन्न झाली तरच आहे असे प्रतिपादन मराठा वधू वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटक म्हणून माजी आ. वसंत चव्हाण हे बोलत होते.
पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, यंदाच्या वर्षी पासून तालुक्यात मराठा सेवा संघाच्यावतीने वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या समाजातील घटक म्हणून सांगतो संख्येने अधिक समाज मराठा असला तरी मराठा समाजातील बहुसंख्य समाजबांधवांची परिस्थिती आज बेताची आहे. नाजूक आहे अनेकांना रोजंदारी व हलाकीची कामे केल्या शिवाय रोजच्या जगण्याचा प्रश्न भागत नाही. कायद्याने हुंडा देणे घेणे जमत नाही तरी ज्यांच्याकडे आहे ती लोकं करतात लग्न समारंभ व इतर कार्यात लाखोंचा खर्च पण अशा समाजातील आर्थिक अक्षम लोकांचा खऱ्या अर्थाने विचार झाला तरच या विवाह मेळाव्याचे सार्थक आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. भास्करराव पाटील खतगावकर , प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, नायगाव नगरपंचायतिच्या नगराध्यक्षा सौ. मीनाताई सुरेश पाटील कल्याण, गट शिक्षणाधिकारी एम.जे. कदम सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत पाटील सुगावे, श्रावण भिलवंडे, संभाजी भिलवंडे, शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र भिलवंडे, भाजप तालुकाध्यक्ष कोंडीबा पाटील, सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष शेरा पाटील, जिल्हाध्यक्ष उद्भव सुर्यवंशी, जिल्हा संघटक डॉ.जीवन चव्हाण सर,जेष्ट पत्रकार गजानन चौधरी पत्रकार माधव चव्हाण आणि कार्यक्रमाचे आयोजक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पवळे, उपाध्यक्ष गंगाधर पाटील चव्हाण, सचिव संतोष पाटील कल्याण, कार्याध्यक्ष डि.टी. जाधव, नागेश पाटील कल्याण, जे.डी. पाटील रातोळीकर, टि.जी. पाटील रातोळीकर, आनंद पवार, विजय पाटील जाधव, व्ही.सी.जाधव, अशोक पाटील कल्याण, निळकंठ पाटील शिंदे, आदींसह उपस्थित वधू वर यांचे नातेवाईक आणि मराठा समाज यांची मोठी उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरां कडून मराठा सेवा संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरेख संचलन हणमंत जाधव सर यांनी केले.
पत्रकार माधव पाटील चव्हाण यांना नुकतेच दुर्गादास प्रतिष्ठानमार्फत उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व हार घालून मराठा सेवा संघ नायगाव च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा