मराठवाडा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यकारणी जाहीर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मराठा मावळा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून मराठा मावळा संघटना ही सामाजिक न्याय हक्कासाठी लढा देत असून गेल्या काही दिवसापासून कोरोना काळाच्या प्रादुर्भावामुळे संघटनेचे कार्य स्थगित होते त्यामुळे संस्थापक अध्यक्ष माणिकराव पाटील शिंदे त्यांनी असा निर्णय घेतला की पुन्हा नव्याने मराठा मावळा संघटना ही कामाला लागली पाहिजे व गोरगरिबांच्या मदतीची धाव मावळ्यांनी घेतली पाहिजे यासाठी मराठवाडा व संभाजीनगर जिल्हा पद नियुक्ती देऊन सर्व पदाधिकाऱ्यास चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले आहे मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मानिकराव शिंदे पाटील यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले व त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावून सांगून आपण समाजासाठी काय केले पाहिजे गोरगरिबांची सेवा कशी केली पाहिजे त्यावर अनुसरून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले
पंढरीनाथ गोडसे पाटील यांची मराठवाडा अध्यक्षपदी, शिवशंकर सागत यांची मराठवाडा उपाध्यक्ष, योगेश्वर माऊली यांची मराठवाडा उपाध्यक्ष, तर साईनाथ गणपतराव पाटील कानोले यांची मराठवाडा प्रसिद्ध प्रमुख पदी निवड झाली आहे.
आज मराठा मावळा संघटनेची जिल्हा बैठक संस्थापक अध्यक्ष प्रा श्री माणिकराव शिंदे पाटील सर यांच्या अध्यक्षते खाली व मराठावाडा अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे केंद्रीय कार्यालय बजरंग चौक सिडको एन 9..येथे मोठ्या उत्साहात पार पडली.बैठकी मध्ये शहर व ग्रामीण ची कार्यकारिणी निवड करण्यात आली. मराठवाडा उपाध्यक्ष शंकर सगट,मराठवाडा सचिव योगेश सुरडकर,मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख साईनाथ कानोले,शहर अध्यक्ष भरत कदम पाटील,ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदयराज गायकवाड पाटील,युवक जिल्हाध्यक्ष सोनाजी जाधव पाटील यांची निवड करण्यात आली,तसेच जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम झळके पाटील,सल्लागार पदी सुधाकर शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष दिपक नारळे,युवक शहराध्यक्ष विशाल जाधव पाटील,युवक शहर उपाध्यक्ष वैभव व्यवहारे पाटील,संभाजीनगर तालुकाध्यक्ष राहुल मते पाटील,सं.नगर तालुका उपाध्यक्ष दिनेश देशमुख, याप्रसंगी श्री वैभव गायकवाड, आदित्य वडेकर, दीपक इंगे पाटील, दीपक नलावडे पाटील, इत्यादी मावळ्यांची उपस्थिती होती.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा