जिरजामाय महिला बचत गटाच्या महिलांनी साजरा केला हळदी कुंकू समारंभ
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील जिरजामाय महिला बचत गटाच्या महिलांनी सामाजिक एकतेचा संदेश देत साजरा केला हळदी कुंकू कार्यक्रम. गटातील महिलांना उबदार, घोंगडी, मफलर, आसण, कोट, सुटर आसा वस्तू मेंढिचा लोकरापासून बनवले वस्तू एकमेकांना भेट देऊन मकरसंक्रांत तीळगुळ, हळदी कुंकू वान देवुन साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे वृक्ष लागवड करुन , सदर कार्यक्रम गिरजामाय महिला बचत गटाच्या महिलांनी आयोजित केला होता. यावेळी सर्व महिलांनी गटाचा ड्रेस कोड परिधान करून एकमेकांना गृह उपयोगी वस्तू देवुन साडी चोळी देवुन सन्मान करण्यात आला. यावेळी गिरजामाय महिला समुहाची अध्यक्ष काश्याबाई मोगले, सचिव धुरपरबाई वडे ,पुजा बिस्मिले ,राजाबाई बहिरे ,गंगुबाई शेटे, अनिता शिंगणे ,मंगल कारताळे ,गोदावरीबाई संभाडे ,शांताबाई शांगे. सागरबाई करतदोडे. समुह संसाधन व्यक्ती रेखाताई अनिल कांबळे कुंटुरकर उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा