शुद्ध पाणी पिण्याची सुविधा उपलब्ध
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
काळाने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती मोठ्या प्रमाणात साधली आहे परंतु दूषित वातावरण असल्याने अनेकांचे जीव धोक्यात चालले आहेत यानुसार प्रत्येकासाठी पाणी फिल्टर पिण्याची आवश्यकता असल्याने तालुक्यातील पळसगाव येथे श्री साई वॉटर फिल्टर चा शुभारंभ जिल्हा परिषदचे माजी सदस्य बालाजी बच्चेवार माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या हस्ते नुकताच संपन्न झालेला आहे.
पळसगाव नगरींचे दत्ता गंगाधर शिंदे यांनी श्री साई वाटर फिल्टर शुभारंभ आयोजित करून संपूर्ण गावकऱ्यांसाठी फिल्टर पाण्याची अर्थात शुद्ध पाणी पिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे याचा आज उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रणजीत कुरे सरपंच ताकबिड, शिवाजी पाटील माजी सरपंच पळसगाव, दशरथ पाटील उपाशे, चेअरमन गंगाधर पाटील उपाशे, गोपीनाथ पाटील, नरसिंग पाटील, माधवराव पाटील उपासे, धोंडीराम पाटील सुपारे, माजी सरपंच शिवराज पाटील वरवटे, पळसगाव नगरीचे विद्यमान सरपंच साहेबराव कांबळे, गोविंदराव पाटील माधवराव पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा