पालवी संस्थेच्या सेवा कार्याबद्दल लोकमत समूह व महाएनजीओ फेडरेशन यांच्यातर्फे सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व लोकमतचे संस्थापक कै. जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपल्या कार्याने समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून, अनेक गरजुंचा आधारवड बनणाऱ्या व्यक्ती आणि सेवाभावी संस्थांचा 'लोकमत अतुल्य सेवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार २ जानेवारी २०२३ रोजी पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या मंगलताई शहा यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, लोकमत वृत्तपत्र संपादक संजयजी आवटे, लोकमत समूहाचे दर्डाजी, शेखर मुंदडाजी, रवींद्र धरियाजी, उपस्थित होते. सदर पुरस्कार लोकमत समूह व महाएनजीओ फेडरेशन यांच्यातर्फे देण्यात आला. महाराष्ट्रातील अडीच हजार संस्थांमधून हा पुरस्कार पालवी संस्था व मंगल ताई यांच्या कार्यासाठी दिला गेला.
हा पुरस्कार पालवीतील विशेष बालके, महिला, वृद्धांना समर्पित करत मंगलताई शहा यांनी पालवीच्या सर्व हितचिंतकाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. अखंड विश्वाला प्रेमाचा संदेश देणाऱ्या संतांची माऊली असलेल्या पांडुरंगाच्या पंढरी नगरीत विशेष पालकांची सेवा करणाऱ्या खऱ्याखुऱ्या माऊलीला हा पुरस्कार मिळाल्याने पंढरपूरकरांची मान अभिमानाने उंचावली असल्याच्या भावना पंढरपूरकरांच्या मनात आहेत हा पुरस्कार मिळाल्याने पालवी संस्था व मंगलताई शहा यांच्यावर समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदन याचा वर्षाव होत आहे . पालवी संस्था आणि मंगलताई शहा यांच्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पालवीच्या वेबसाईटला भेट द्या
संपर्क : ९६७३६६४४५५. वेबसाईट www.palawi.org
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा