रक्तदान सारख्या महान अश्या कार्यामुळे आपले व इतरांचे जीवन कृतार्थ होते
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते महान व पवित्र कार्य आहे. रक्तामुळे अनेकांना जीव गमवावा लागला याची उदाहरणे सर्वत्र आहेत काहीच्या कुटुंबात अंधार झाला असल्याची अनेक उदाहरणे ही या बाबतीत आहेत.
रक्तदान सारख्या महान अश्या कार्यामुळे आपले व इतरांचे जीवन कृतार्थ होते. एखाद्याचे जीव वाचविण्यासाठी नायगाव विधानसभेचे युवा नेते तथा माजी सभापती तथा भाजप जिल्हा सरचिटनिस शिवराज पाटील होटाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन होटाळकर मित्र मंडळाचे पदाधिकारी विकास पवार गोळेगावकर यांनी केले आहे.हे महत कार्य करते वेळी सर्वांनी रक्तदान श्रेष्ठ दानअसल्याने सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे.
कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्राला अनेक वेळा रक्ताच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले, भविष्यात ही परिस्थिती उदभवूनये म्हणून मागील अनेक वर्षापासून शिवराज पाटील होटाळकर मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेण्यात येते.
या वेळीचा वाढदिवस सन्समरनिय व्हावा व सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा याच धर्तीवर नायगाव विधानसभेचे युवा नेते माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव, उमरी व धर्माबाद भाजपच्या व होटाळकर मित्र मंडळाच्या वतीने ८ जानेवारी रविवार रोजी सकाळी ९ पासून कै.डी.बी.पाटील होटाळकर कॉपलेक्स नायगाव च्या समोर रक्तदान शिबिरास सुरुवात होणार आहे. या शिबिराचे उदघाटन प्रणिता ताई देवरे चिखलीकर ,लक्ष्मण ठकरवाड,राजेश कुंटुरकर , डॉ.गुणवत पाटील चिकनेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.यात जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन शिबिराचे संयोजक विकास पाटील पवार व मित्र मंडळ कार्यकर्ते यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा