दुकान मालकावर अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथे किराणा दुकानात अवैध गुटखा व आर एम डी. असा 104 पुडे व इतर पुडे सापडले . कुंटूर पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की सुजलेगाव येथील किराणा दुकानात अवैध गुटखाचा साठा करुन विक्री केली जात आहे. दिगांबर लक्ष्मण तोडे वय वर्षे 37 यांच्या किराणा दुकानावर कुंटूर पोलिसांनी छापा मारला यामधे 11500 रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुप्त खबऱ्यांकडून खात्रीशीर मिळालेल्या माहितीच्या आधारे कुंटूर पोलिसांनी 13/1/2023, रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी दुकान चालक मालक दिगांबर तोडे याचावर कुंटूर पोलीस ठाण्यात कलम. 188,273,272,328, अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली गिते बिट प्रमुख हे करित आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा