राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड शहर उपाध्यक्ष पंकज कांबळे यांची मागणी
नांदेड प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
लोहा तालुक्यातील कांबळज येथे शासनाने कुठलीही परवानगी दिली नसतानाही मारतळा परिसराचे तलाठी व मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून कांबळज येथे परराज्यातून आलेल्या ५०० व्यक्ती गोदावरी नदीपात्रातून दररोज हजारो बरास अवैद्य रेती उपसा करत असून याकडे तलाठी व मंडळाधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ कांबळज येथे होणारा अवैद्य वाळू उपसा बंद करून तलाठी व मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड शहर उपाध्यक्ष पंकज कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे .
लोहा तालुक्यातील अगदी टोकावर असलेल्या कांबळज येथे गोदावरी नदी पात्रातून परराज्यातून आलेल्या पाचशे व्यक्तींच्या साह्याने व सेक्शन पंपाद्वारे दररोज हजारो अवैद्य रेती उपसा चालू असून या ठिकाणी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या घशात जात असल्यामुळे व तलाठी मंडळ अधिकारी यांना आर्थिक माया पोटी वाळू माफियांनी हाताशी धरून या ठिकाणी अवैद्य रेती उपसा करून शासनाचा लाख रुपयांचा महसूल बुडत असून त्याची तात्काळ चौकशी करून तलाठी व मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे व होत असलेला अवैद्य रेती उपसा तात्काळ थांबवण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष पंकज कांबळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केले आहे त्यामुळे अवैद्य वाळू उपसा न थांबल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पंकज कांबळे यांनी दिला आहे व दिलेल्या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा