एका कुंटुर गावातील 350 मिटर लाभार्थी कडे 27,41700 रुपये थकबाकी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलच्या कुंटूर येथे सब स्टेशन 33 केव्ही सब स्टेशन अंतर्गत कुंटूर उपकेंद्र अंतर्गत एकूण 14 गाव येतात 14 गावांमध्ये एक कोटी 25 लाख रुपये वीज वितरण कंपनीची थकबाकी नागरिकाकडे आहे . त्यामुळे वेळेवर वीज पुरवठा कसा होईल व नागरिकांनी वेळेवर वीज बिल भरले तर वीज पुरवठा केला जाईल असा सवाल यांनी केला आहे . एकट्या कुंटुर गावाची 27 लाख 43 हजार 500 थकबाकी असून बाकी तेरा गावांमध्ये 98 लाख असुन 14 गावांमध्ये कोटीच्या वर वीज पुरवठ्या ची रक्कम भरणा बाकी आहे.
मात्र नागरिकांनी वीज बिल वेळेवर भरले नाही त्यामुळे एक कोटीच्या वर थकबाकी असून वेळेवर वीज पुरवठा केला जावा अशी नागरिकांची ओरड केली जाते. त्यामुळे कुंटूर सह एकूण 14 गावांमध्ये वीज वितरण कंपनीची थकबाकी म्हणावे तसे नागरिकांनी वेळेवर भरत नाही कुंटूर मध्ये 350. महिन्याचे मीटर धारक आहेत . बाकी सर्वांनी आकडे टाकून वीज घेतली आहे त्यामध्ये काही नागरिक तर काही राजकीय पुढारी देखील असून त्यांच्या घराला मीटर नसून अवैध विज कनेक्शन सुरू आहे. कुंटुर, धनंज सांगवी सातेगाव,मेळगाव, तांडा, ईकळीमाळ, परडवाडी, सालेगाव, इतरही अनेक गावांत, कनेक्शन असूनही वेळेवर वीज पुरवठा केला जात नाही अशी ओरड होत असते मात्र विजेचे बिल वेळेवर भरले तर महावितरण कंपनीकडून वीजही पुरवठा केला जाईल अशी माहिती दुधमल यांनी दिली आहे.
त्यावेळी जागरूक नागरिकांनी मीटर बसून घ्यावे वीज चोरी थांबवावी, शेगडी, हिटर, पाण्याची मोटार, यामुळे विजपुरवठा वर परिणाम होतो. त्यामुळे फ्युज जाणे, डिपी जळणे आसे प्रकार घडत असतात. त्याचबरोबर वेळेवर वीज बिल भरा व महावितरण ला सहकार्य करा अशी आवाहनही यावेळी जे इ दुधमल यांनी केले.
एक कोटी 25 लाखाची थकबाकी लवकरच भरा असे आव्हानही त्यांनी केले .वीज कनेक्शन कापण्यात येईल व अवैध वीज कनेक्शन वर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर आकडे बहादुर यांच्या वर कारवाई करुन दंड आकारण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली
सहाय्यक अभियंता मी गेल्या सात महिन्यापासून सहाय्यक अभियंत्याचा पदभार घेतला कुंटुर सर्कल मधील काही गावांमध्ये जाऊन मध्ये चार गावांमध्ये 22 आकडे बहादुर वर कारवाई केली आहे. काहींनी दंडाची रक्कम भरली तर काहींनी अद्याप भरलेली नाही. त्यामुळे वीज चोरी प्रकरण रोखूनही कारवाई केल्या नंतर ही नागरिक त्याला भीत नाहीत व वेळेवर वीज बिल भरत नसल्यामुळे वीजपुरवठा वेळेवर होत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा