कुंचेलि ता. नायगाव येथे धार्मिक कार्यक्रमाचेआयोजन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव ता. कुंचेली येथे नविन वर्षाच्या सुरूवातीला हरिनाम सप्ताह अनेक धार्मिक कार्यक्रम हभप सदगुरू च़द्रशेखर महाराज देगलुरकर, हभप सदगुरूनराशाम महाराज यांच्या कृपा आर्शिवाने आयोजित केले आहे. दररोज पाहाटे काकडा आरती, सकाळी ग्रथ ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन,हरिपाठ, रात्री ८ ते १० हरिकिर्तन, दि.२० जाने.२३ हभप विष्णु महाराज तांंदळीकर २१ जाने.२३हभप भागवताचार्य तुकाराम महाराज साखरे, २२जाने.२३, हभप वासुदेव महाराज कोंलबीकर,
२३ जाने.२३ हभप मारोती महाराज सातारा २४ जाने.२३ हभप योगेश अग्रवाल वसमत २५ जाने २३ हभप कु.वेदिकाबाई महाराज बरबडा,दि.२६ जाने.हभप किसन महाराज बरबडेकर दि.२७ जाने.२३ काल्याचे किर्तन हभप किसन महाराज बरबडेकर नंतर महाप्रसाद रात्री,जागरण असे चोविस तास नामस्मण करून नविन वर्ष सुखसमृध्दीने सर्वाना आरोग्य, सदगुण प्राप्त व्हावे ,सर्व जनता एकोप्याने राहावे,दुर्गुन प्रवृती नष्ठ होऊन सदगुन प्रवृती निर्माण व्हावी,व्यसनापासुन दुर व्हावे,सदगुणी पिढी निर्माण व्हावी, आई,वडील गुरूची सेवा करण्याची प्रवृती निर्माण व्हावी दुषित वातावरण अशा धार्मिक कार्याने वातावरनाची शुध्दीकरण व्हावे म्हणुन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
ज्ञानेश्वरी व्यासपिठ ज्ञानेश्वर महाराज बोरगडीकर,चंपतराव डाकोरे पाटिल ,गाथा व्यासपिठ बापुराव पाटिल टाकळिकर, गायनाचार्य हरिपाठ आकाश पाटिल तांदळिकर,गंगाजी महाराज,रमेश पाटिल साईनाथ पाटिल,मृदंगाचार्य विश्वेश्वर महाराज कोलंबि,तुकाराम महाराज मोकासदरा अशा अनेक संताच्या ऊपदेशाने कुंचेली परिसरातील सदभक्तानी अनेक कार्यक्रमात सहभागी होऊन आंनदोत्सवात सहभागी व्हावे. कार्यक्रम यशस्वी व ऊत्साहात संपन्न करून आपल्या जिवनाचे सार्थक करून घ्यावे अशी प्रसिध्दी सर्व गावकरी सदभक्त मंडळी कुंचेलीच्या वतीने देण्यात येते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा