कुंटूर पोलिसांची चमकदार कारवाई
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे काहाळा खुर्द या ठिकाणी देशी दारूचे गाडीतून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली असता. साहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांना माहिती मिळाल्यावर आरोपी अण्णाराव श्रीहरी जाधव वय 36 राहणार धानोरा तालुका कंधार यांनी चोरट्या मार्गाने दारू वाहतूक करणारा असल्याची माहिती कुंटुर पोलिसांनी मिळाली होती. मिळाली माहितीवरून कुंटुर पोलीस स्टेशनच्या वतीने साहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी, यांच्या सह पथक रवाना केले आसता. 24.1.23 रोजी आठ वाजताच्या सुमारास देशी दारूचे बारा बॉक्स विक्री करण्यासाठी किंमत चाळीस हजार तीनशे वीस रुपये व टाटा सुमो एम एच 26 R0777 या टाटा सुमो मध्ये किंमत तीन लाख रुपये यामध्ये घेऊन जाताना पोलीस यांनी पकडले.
आरोपी अण्णाराव श्रीहरी जाधव यांच्या सह एकूण तीन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी अण्णाराव श्रीहरी जाधव राहणार धानोरा तालुका कंधार यांच्या वरू पोलीस शंकर बुध्देवाड यांच्या फिर्यादीवरून 65 ई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल सोनकांबळे करीत आहेत. सदर ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी , पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले, पोलीस कॉन्स्टेबल शंकर बुध्देवाड, अशोक घुमे यांनी केली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा