मान्यवरांच्या हस्ते स्वाभिमानी गुळाचा चहा, या हॉटेलचे उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कुंटूरकर) जिल्हा प्रतिनिधी
असंख्य माणसे विविध आजाराने त्रस्त असले तरी साखरेचा चहा शरीराला हानिकारक असतो मात्र गुळाचा चहा मिळत नसल्याने नायगाव शहरात साखरेच्या चहाचे सेवन लोकांना करावे लागत असे पण नायगावकरांच्या आरोग्यासाठी आता शहरात मिळणार स्वाभिमानी गुळाचा चहा, या हॉटेलचे उद्घाटन श्रीनिवास पाटील चव्हाण, भास्कर पाटील भिलवंडे, ज्येष्ठ नागरिक भाऊराव पाटील चव्हाण, गजानन पाटील चव्हाण, राजेश लंगडापुरे, विठ्ठल गवळी या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
माणसांना थोडी थकावट किंवा आळस आला की चहा गरम चहाचे सेवन करावे वाटते किंवा मित्रमंडळी पाहुणे यांचा पाहुणचार देखील चहानेच होतो पण अति प्रमाणात साखरेच्या चहाचे सेवन करीत असल्याने ते शरीराला हानिकारक ठरू शकते असे कित्येकांना वाटत होते पण गुळाच्या चहाचे हॉटेल नायगाव शहरात उपलब्ध नव्हतेच, ग्राहकांचा कौल ओळखून माधव चिंतले टाकळीकर आणि संदीप जैनर यांनी स्वाभिमानी आरोग्यदायी गुळाचा चहाचे हॉटेल शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आले.
या चहाचे वैशिष्ट्य रोग प्रतिकार शक्ती वाढविते, थंडी आणि तापपासून संरक्षण करते, वजन नियंत्रण करते, रक्त शुद्ध करते, हिवाळ्यात शरीराला उष्णता देते, शरीरातील लोह वाढवते असे कितीतरी गुणकारी असलेली ही गुळाचा चहा नायगावकरांच्या आरोग्यासाठी सेवेत आहे. येणारे प्रत्येक जण गुळाच्या चहाचा आस्वाद घेत निरोगी शरीर हाच खरा दागिना असे बोलू लागले. या शुभारंभ वेळी गंगाधर पा. कल्याण विलास गौड, नागेश मेटकर, साहेबराव सुर्यकार जीवन सावकार देमेवार, अतुल मंगरूळे लींगोजी पाटील जाधव, कैलास नळेगावे, देविदास सूर्यवंशी, गजानन पा.पवार,तंमु.अध्यक्ष बालाजी पा.आकले, गंगाधर राहिरे यासह अधिजनाची उपस्थिती होती.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा