डोंगरगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावात अस्वच्छतेचा कळस
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कुंटूरकर) जिल्हा प्रतिनिधी
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे डोंगरगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत गावात अस्वच्छता पसरली आहे . नालीचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे . जागोजागी कचऱ्याचे ढीगारी पडले असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बाजूलाच विद्यार्थ्यांच्या मुतारी समोरच कचऱ्याचे ढीग पसरले असून दुर्गंधीयुक्त वास येत आहे. त्यामुळे नागरिकासहित विद्यार्थ्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे . याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे माहिती गावातील ग्रामपंचायत सदस्य गजानन नारे डोंगरगावकर यांनी सांगितले.
सदर ग्रामपंचायत स्वच्छता करून नाली बांधकाम करून रस्त्यावर येणारे घाण पाणी तुरंत थांबवावे ग्रामपंचायत अंतर्गत मासिक बैठक घेण्यात आली नाही . त्यामुळे आलेला निधी उपलब्ध किती, खर्च किती, खर्च झालेले माहितीही मिळत नसल्याची तक्रार पंचायत समिती येथे करणार असल्याचे सांगितले व यासाठी उपोषण ही धरणार आहे. अशी माहिती गजानन नारे यांनी दिले आहे त्यामुळे डोंगरगाव येथील ग्रामपंचायत कारभार ढेपाळला असल्याचे सदर चित्र पाहण्यास मिळत असून अस्वच्छता तसेच घाण पाणी रस्त्यावर असून डासांची पैदास केंद्र बनलं आहे. मछरच प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत गावात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, नाली बांधकाम करण्यात यावी. मासीक बैठक घेऊन चौदाव्या वित्त व पंधराव्या वित आयोगाच्या निधी मंजूर, खर्च झालेले माहितीही देण्यात यावी अन्यथा पंचायत समिती नायगाव समोर उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत सदस्य गजानन नारे यांनी दिला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा