सरकारी वकील ॲड. भोसले म्याडम यांनी पिंपळ वृक्ष लागवड करून सामाजिक बांधिलकी जोपासली

न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांना भविष्यात मिळणार थंड सावली

Public Prosecutor, Adv. Bhosale, tree planting, civil court, naigao, nanded, shivshahi news,

नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर 

            नायगाव येथील दिवाणी न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांना थंड सावली मिळावी या दूरदृष्टीने वृक्षप्रेमी तथा नायगाव न्यायालयाचे सरकारी वकील भोसले म्याडम यांनी दिनांक २७ डिसेंबर रोजी न्यायालयांच्या परिसरात नागरिकांना २४ तास ऑक्सिजन देणाऱ्या पिंपळ वृक्षाची लागवड करून सामाजिक बांधिलकी जपत त्या झाडाची मोठे होई पर्यंत देखभाल करणार असल्याचे सांगितले असून यामुळेच त्याचे पक्षकारातून कौतुक केले जात आहे. 

             पिंपळाचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे.मात्र त्या सावलीचा आपल्या आरोग्यासाठी फायदा होतो याची तुम्हाला कल्पना आहे का? पिंपळाच्या झाडाला पौराणिक कथांमध्ये पूजलं जाते पण त्याचा खरा फायदा होतो तो आरोग्यासाठी. पिंपळाच्या झाडाचे महत्व खूप आहे. हे असं झाड आहे जे दिवसातील २४ तास नागरीकांना ऑक्सिजन मिळवून देतं. याच्या सावलीचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होतो. त्यामुळे प्रत्यकाने एका वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांधिलकी जपावे असे नायगाव न्यायालयाचे सरकारी वकील भोसले म्याडम यांनी आदर्श गावकरी शी बोलताना सांगितले.

         आपण जर बारकाईने लक्ष दिले तर आपल्याला लक्षात येईल की, मानवाचे आयुष्य पृथ्वीवर टिकवून ठेवण्यासाठी व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी वृक्ष किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे वृक्ष नसते तर आपले जीवन जितके सुरळीत चालले आहे तितके सुरळीत चालले नसते. मात्र भरपूर प्रमाणात वृक्षतोड तोड होत आहे.त्यामुळे कडक उन्हाळा, प्रदूषण आणि तापमानवाढ अशा समस्या दिवसेंदिवस उद्भवत आहेत. तसेच झाडांची कमी होत चाललेली संख्या यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच आपले ऋतुचक्रही बदलत चालले आहे. त्यामुळे अशा समस्यांपासून आपल्याला आपला आणि सभोवतालच्या पर्यावरणाचा बचाव करायचा असेल तर वृक्षलागवड करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे लक्षात घेऊन सरकारी वकील भोसले म्याडम यांनी पिंपळ वृक्ष लागवड केले आहे.

             यावेळी नायगाव न्यायालयाचे सरकारी वकील भोसले म्याडम ,एम.एस.नरवाडे ,अँड.एस.जी.कोकणे,अँड.पि.एम.वाघमारे,अँड.मांजरमकर, शैलेश मगिरवार ,पोकॉ.रावसाहेब कदम ,पो.हे.कॉ.शिंदे ,पो.कॉ.वर्षाताई पोकॉ.निकम यांची उपस्थिती होती.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !