शौचालय न बांधताच १०० शौचालयाचे परस्पर अनुदान उचलले

बामणी येथील विलास कल्हाळे या ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी

Sauchalaya funds fraud, Bamani, Kandhar, nanded, shivshahi News,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कुंटुंरकर) जिल्हा प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील बामणी ( पं.क ) येथील तात्कालिन ग्रामसेवक विलास कल्हाळे यांनी सन २०१७-१८-२०१९ मध्ये गावातील १०० नागरिकांना प्रत्येकी शौचालय बांधकामासाठी १००० रु निधी आला असता तो निधी गावकऱ्यांना पत्ता न लागता परस्पर ग्रामसेवकाने निधी हडप केला आहे.

गावातील नागरिकांना स्वच्छालय न देता नागरिकांच्या नांवाने १०० स्वच्छालयचे परस्पर अनुदान स्वतःचा हाडप कले आहे त्याची तात्काळ चौकशी समिती नेमुन चौकशी करून तात्कालिन ग्रामसेवक विलास कल्हाळे यांना निलंबित करण्यात यावे.

सदरील स्वच्छालय बामणी येथील गावकऱ्यांना घर तेथे शौचालय ही योजना राबविण्यात आली होती.व गाव हागणदारी मुक्त करण्याचा शासनाचा नियमानुसार बामणी येथील नागरिकांना घर परत शौचालय देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने स्वच्छालय निर्माण करण्याचा निराधार केला असता बामणी येथील तात्कालीन ग्रामसेवक श्री विलास कल्हाळे यांनी गावकऱ्यांना कुठलीही माहिती न देता मनमानी कारभार करत त्यांनी शंभर स्वच्छालय याचा आलेला निधी परस्पर उचलून तो निधी त्यांनी हडप केला असून 

गावातील गावकऱ्यांनी आम्हाला स्वच्छालय मिळवून द्यावा असा विनंती अर्ज त्यांनी सध्या ग्रामपंचायतकडे केला असता ही धक्कादायक बाप समोर आली आहे अर्ज केलेल्या व्यक्तीच्या नावाने २०१७-१८-२०१९ मध्ये तुमच्या नावाने स्वच्छालय मंजूर झाले आहेत ते रक्कम तुम्ही उचलली आहे त्यामुळे तुम्हाला स्वच्छालय पुन्हा देता येत नाही असे समजल्यानंतर त्या गावकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आम्हाला तर स्वच्छालय आले नाही मग स्वच्छालयाचा आलेला निधी कोणी उचलला असे गावकऱ्यांनी म्हणताच त्यांना उडवा उडवी चे उत्तरे देण्यात आली लाभ न मिळालेल्या गावकऱ्यांना त्यांचे हक्काचे स्वच्छालय देण्यात यावे व निधी उचलून परस्पर हडप करणाऱ्या ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मारुती व्‍यंकटी कदम यांनी जिल्हाधिकारी साहेब नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व पंचायत समिती कंधार यांना दिले आहे दिलेल्या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !