दोन लाख रोख रक्कम आणि सोने असा पाच लाखांचा ऐवज लंपास
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक फोडून चोरट्यांनी तीन लाख दोन हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे दोन लाख रुपयांचे सोने लंपास केले आहे. घटनेची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण, तालुका, आणि शहर पोलीस स्टेशनची तपास पतके तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता बँक बंद झाली. शनिवार आणि रविवारी बँकेला सुट्टी असल्याने, सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी बँक उघडल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने बँकेच्या मागची लोखंडी खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला. त्यानंतर मेन पॉवर सप्लाय कट करत सीसीटीव्ही अलार्म सिस्टीम बंद पडले. गॅस कटरने बँकेची सेफ तोडून रोख रक्कम आणि सोने चोरून नेले. दरम्यान गॅस कटरने तिजोरी तोडताना, बाहेर कोणाला समजू नये, यासाठी सर्व खिडक्यांना कापडाचे गोळे आणि उशा घालून बंद केले होते. सोमवारी घटनेची माहिती मिळाली तेव्हा पंढरपूर ग्रामीण, पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची तपास पथके घटनास्थळी पोहोचून तातडीने तपास सुरू केला आहे. फिंगरप्रिंट एक्स्पर्ट टीम पाचरण केली आहे. घटनास्थळावरील ठशांचे सॅम्पल घेतले आहेत. दोन दिवसांच्या सुट्ट्यांच्या दरम्यान चोरी झाल्याने घटनेची निश्चित वेळ समजली नाही.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक सरदेशपांडे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा