पोलीस पाटलाच्या मानधनात वाढ करावी आणि इतरही विविध मागण्या
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड ( मिलिंद कुमार लांडगे )
पोलीस पाटलाच्या मानधन वाढीसह विविध मागण्या मान्य करण्यासाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघ राज्याध्यक्ष महाराष्ट्र बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटलांचा मोर्चा होत आहे. या मोर्चासाठी पिशोर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे पोलीस पाटील रवाना झाले.
कन्नड तालुका उपाध्यक्ष तुषार काकुळते, तालुका कार्यकारी अध्यक्ष निलेश बलसाने, तालुका संघटक विजय खिल्लारे, पिशोर सर्कलाध्यक्ष नारायण निकम यांनी सफोनी शिंदे मॅडम यांना निवेदन देले. त्याच बरोबर उपस्थित पोलीस पाटील मध्ये तालुका कार्यकारणी सदस्य गणेश वेताळ, गोविंद देशमुख, ज्ञानेश्वर सोळुंके, रवी सूर्यवंशी, सूर्यभान राऊत, कृष्णा अग्रे रामकृष्ण वाघ सह पोलीस पाटील उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा