तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत अरुण अनिल कांबळे, व साक्षी शिंपाळे नायगाव तालुक्यात प्रथम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर )
नायगाव तालुक्यातील वीरबाल दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय वकृत्व, निबंध स्पर्धेत, तालुक्यात प्रथम आला आहे. जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कुंटुर तालुका नायगाव येथे वर्ग दहावी मध्ये शिकत असलेल्या कु.अरुण अनिल कांबळे, कु. साक्षी शिंपाळे , हे विद्यार्थी तालुकास्तरीय वकृत्व निबंध स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पालक व शिक्षक वर्गातुन त्यांचे कौतुक केलं जातं आहे. येथील सर्व शिक्षक संजय राजपूत मुख्याध्यापक, नेहरू, अरविंद जामकर, विनायक पदमावार, वंदना चाटारो , यांनी मन पुर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा