तालुक्यातील अंगणवाड्यात सुरू आहे मनमानी कारभार
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (विष्णू मुंगसे)
नेवासा तालुक्यातील एकूण128 गावांचा समावेश आहे या सर्व गावांमध्ये अंगणवाडी गावठाण सर्व वस्तीवर शासनाने मान्यता देऊन कोट्यावधी रुपयांच्या इमारती बांधकाम करून सर्व गोरगरिबांचे मुला-मुलींना आहार व शिक्षणासाठी सोय उपलब्ध करून दिलेली आहे या सर्व अंगणवाड्यामध्ये 1ते 6 वर्ष पर्यंत च्या मुला मुलींना शासनाने आहार चालू केलेला आहे त्यामुळे सर्व अंगणवाड्यामध्ये लहान बालकासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून खेळणी आहार हे सर्व मानधनाप्रमाणे करून घेण्याचे काम करत आहे
परंतु हे सर्व काम नेवासा एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी नेवासा हे दुर्लक्ष करत असल्यामुळे सर्व नेवासा तालुक्यामध्ये सकाळी अंगणवाडीचा टाइमिंग 9ते 2 वाजेपर्यंत असून तरीदेखील सकाळी सर्व नेवासा तालुक्यामध्ये मनामनी कारभार असल्यामुळे अंगणवाडींना तालुक्यामध्ये कोणताही टाइमिंग दिसून येत नाही व प्रत्येक अंगणवाडी मध्ये किती मुलाची उपस्थिती आहे हे सर्व पाहण्यासाठी तालुक्यामध्ये सुपरवायझरची नेमणूक केलेली आहे परंतु सुपरवायझर देखील डोळे झाक पणा दिसून येत आहे त्यामुळे आता तरी जबाबदारी अधिकारी नेवासा तालुक्याचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी नेवासा हे लक्ष देणार की नाही अशा चर्चेला उधाण आले आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा