maharashtra day, workers day, shivshahi news,

मंगळवेढा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींवर आ. आवताडे गटाचे एकहाती वर्चस्व

आवताडेंच्या रुपाने भारतीय जनता पार्टीचे मंगळवेढामध्ये निर्विवाद वर्चस्व

grampanchayat election, mla samadhann autade, mangalwedha, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा ( राज सारवडे )

मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांच्या १८ ग्रामपंचायतीमध्ये पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर - मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाने तब्बल ९ ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मंगळवेढा तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतपैकी रहाटेवाडी व फटेवाडी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी रहाटेवाडी या ग्रामपंचायतवर आमदार आवताडे यांच्या गटाचे दत्तात्रय धसाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

आ. आवताडे यांच्या गटाने बाजी मारलेले लोकनियुक्त सरपंच पुढीलप्रमाणे व त्यांची गावे पुढीलप्रमाणे - मारापूर - विनायक माधवराव यादव, डोंगरगाव - सारिका विवेक खिलारे, खोमनाळ - बायडाबाई राजेंद्र मदने, गुंजेगाव - विमल शिवाप्पा चौगुले, हाजापूर - मैना दादासो देवकुळे, सोड्डी - काशीबाई सिदमल्ला बिराजदार, भालेवाडी - श्रीकांत एकनाथ दवले, येड्राव - संजय तुकाराम पाटील अशी सत्ता स्थापनेची समीकरणे आ. आवताडे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली तयार झाली आहेत.

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आमदारकी पदाची सूत्रे हातात घेतल्यापासून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्याही प्रकारचा गट - तट न पाहता केवळ सामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे हा हेतू समोर ठेवून आपले कार्य सुरु ठेवले आहे. मतदारसंघ कार्यक्षेत्रातील धोरणात्मक विकासाच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील मूलभूत आणि पायाभूत सोयी - सुविधा मजबूत करण्यासाठी आ. आवताडे यांनी रस्ते, वीज, आरोग्य आदी बाबींकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देऊन ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचवण्यास जोर दिला आहे. 

तालुक्याच्या विविध भागातील रस्ते निर्मिती व सुधारणा यासाठी आ. आवताडे यांनी भरीव निधी पदरात पाडून अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रस्ते विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. आ. आवताडे यांच्या कार्याच्या या विधायक पद्धतीवर विश्वास टाकत तालुक्यातील जनतेने आपल्या मताचा कौल आ. आवताडे यांच्या बाजूने पुन्हा एकदा टाकला असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये सुरु झाली आहे. सदर निकालामुळे आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे पारडे तालुक्यातील विविध गावांमध्ये जड होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


मंगळवेढा तालुक्यातील जनतेने माझ्या कार्यनेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींवर लोकनियुक्त सरपंच व सदस्य यांना आपली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तमाम जनतेस मी धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आपण ज्या अपेक्षेने आमच्यावर विश्वास टाकला त्यास आम्ही आमच्या कामातून सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्नशील राहू
- आ. समाधान आवताडे.  

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !