maharashtra day, workers day, shivshahi news,

तर फडणवीसांची पंढरपुरातून आम्ही हत्तीवरून मिरवणूक काढू - मनसे नेते दिलीप धोत्रे

मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव

pandharpur corridor, dilip dhotre, maharashtra navirman sena, raj thakare, dcm devendra fadnvis, bjp, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर 

पंढरपूर कॉरीडोरबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सोलापूर येथून पंढरपूर उध्वस्त न करता पंढरपूरचा विकास करू. असे जाहीर केले . 

यानंतर आज पंढरपुरातील स्थानिक नागरिक , व्यापारी आणि वारकरी सांप्रदायाच्या बैठकीत फडणवीस साहेब यांच्या आभाराचा ठराव झाला. मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले दिलेले वचन पाळावे. त्यांनी कुठल्याही नागरिकाचे विस्थापन न करता घरदार न पडता पंढरपूरच्या विकास करायला जर सुरुवात केली, तर त्यांची पंढरपुरातून आम्ही हत्तीवरून मिरवणूक काढू अशी घोषणा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली. 

पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आणि संतभूमी बचाव समिती तसेच सर्वपक्षीय बैठक आज पंढरपूर येथे संपन्न झाली. या बैठकीत याबाबतचा ठराव झाला. तसेच पंढरपूर कॉरिडोर बाबत देखील विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच कॉरिडॉर मध्ये लोकांची घरदार वाचवण्यासाठी आगामी काळात कुठली भूमिका असावी. याबाबतही चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.  

  यावेळी ह भ प रामकृष्ण महाराज वीर, आदित्य फत्तेपुरकर ,ऋषिकेश उत्पात , बाबाराव महाजन बडवे, श्रीकांत हरिदास, नाना मालक कवठेकर, संतोष कवडे ,सुमित शिंदे, गणेश अंकुशराव , गजानन भिंगे , नकुल बडवे यासह मोठ्या संख्येने नागरिक व्यापारी उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !