प्रदर्शनापूर्वी कलावंताचा नांदेडकरांशी दिलखुलास संवाद
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटुंरकर )
'गैरी' हा चित्रपट केवळ मनोरंजनच करत नाही तर अनेकदा प्रेक्षकांना अंतर्मुख करते, अस्वस्थ करते! आदीवासी समाजाच्या आरोग्य विषयक समस्यांकडे गांर्भियाने पाहण्याची दृष्टी देते, त्यामुळे हा चित्रपट करत असतांना मला खुप आत्मिक समाधान मिळाले असुन अर्थात याचे श्रेय चित्रपटाचे निर्माते प्रविण बालाप्रसाद बियाणी आणि दिगदर्शक पांडुरंग जाधव यांना आहे, या शब्दात या चित्रपटाच प्रमुख अभिनेता मयुरेश पेम यांनी आपल्या नांदेडकराशी दिलखुलास चर्चा करताना व आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या.
'गैरी' चित्रपटाच्या प्रमोशनासाठी या चित्रपटातील कलावंत नांदेड शहरात दाखल झाले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत मयुरेश पेम बोलत होते. प्रणव रावराणे, नम्रता गायकवाड, आनंद इंगळे आदी सहकलाकारांची या प्रसंगी उपस्थिती होती. भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतर देखील आदीवासी समाजाच्या वैद्यकीय समस्या आहेत तशाच आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत, चुकुन असलीच तर तिथ डॉक्टर नसतात. त्यामुळे या नागरिकांना कुठल्याच आरोगय सुविधा मिळत नाहीत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना या समाजाचं हे जगणं ही शोकांतिका आहे 'गैरी' हा चित्रपट अतिशय समर्थपणे या विषयाला नेमकेपणानं भिडतो, त्यामुळे 'गैरी' हा चित्रपट एकुणच प्रवाहाला छेदुन आपल्या जाणिवा प्रगल्भ करतो अशी माहितीही मयुरेश यांनी दिली.
चित्रपटाची प्रमुख तारका नम्रता गायकवाड हीने देखील या पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. 'गैरी' हा चित्रपट सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना प्रचंड आवडेल असा विश्वास नम्रता हीनं व्यक्त करतांनाचा कलावंताचं अभिनय आणि चित्रपटाची गीते हे या 'गैरी' चं वेशिष्टये आहे. प्रसिद्ध गीते गीतकार गुरु ठाकुरच्या तरल गीतांना संगीतकार अमितराज यांनी अत्यंत श्रवणीय संगीत दिलं आहे गैरी च संगीत सध्या विविध प्लॉटफॉर्मवर गाजते आहे असंही नम्रता यावेळी म्हणाली.
या चित्रपटातील दुसरा सहकलाकार प्रणव रावराणे यानेही पत्रकारांशी संवाद साधला व चित्रपटाचा अनुभव निर्माता प्रवीण बियाणी व दिगदर्शक जाधव यांच्या कार्यची प्रशंसा केली. गैरी हा चित्रपट येत्या १६ डिसेंबर रोजी संपुर्ण महाराष्ट्रात झळकणार असुन प्रविण बियाणी सारखे तरुण वेगळया विषयांवर चित्रपट निर्माण करताहेत ही बाब मराठी चित्रपटसृष्टीसाठी स्वागतार्ह आहे. यापुढेही गैरी सारखे प्रयोगशील प्रयत्न झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करतांना प्रणव यांने चित्रपटाचे निर्माते प्रविण बियाणी आणि दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांच कौतुक केले.
या पत्रकार परिषदेला नांदेडचे उद्योजक माजी नगरसेवक तथा या चित्रपटाचे निर्माते प्रविण बियाणी, दिग्दर्शक पांडुरंग जाधव,यांनी चित्रपटाची पार्शवभूमी सांगितली.अनिता संजय बियाणी, अनिल मुंदडा, यां सह प्रवीण बियाणी मित्र परिवाराची या वेळी उपस्थिती होती.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा