गावच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही
शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा ( राज सारवडे )
फटेवाडी सारख्या गावात राजकीय स्पर्धा तीव्र असून सुद्धा समविचारी आघाडीच्या माध्यमातून सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध होणे कौतुकास्पद आहे भविष्यकाळात गावच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिले
मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदी समविचारीच्या सीमा प्रकाश काळुंगे यांची तसेच सात सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच पॅनल प्रमुख औदुंबर वाडदेकर रावसाहेब फटे यांचाही आमदार परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की फटेवाडी येथे औदुंबर वाडदेकर व रावसाहेब फटे हे दोघे ग्रामपंचायतच्या निमित्ताने एकत्रित येऊन गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे भविष्यकाळात विकास कामांच्या माध्यमातून फटेवाडी गाव आदर्श व्हावे गावाच्या विकासकामासाठी सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी गावच्या हिताचा कारभार करून नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा द्याव्यात असे सांगितले
या सत्कार समारंप्रसंगी दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील संचालक औदुंबर वाडदेकर रावसाहेब फटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप इनुस भाई शेख भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरुकुल ,प्रकाश काळुंगे नूतन सरपंच सीमा काळुंगे,उपसरपंच पल्लवी शिंदे, सदस्य संभाजी चव्हाण,सुरेश मोटे देवराज इंगोले, दत्तात्रय थोरवत पैगंबर बारगीर ,सचिन अवताडे दिगंबर शिंदे,पप्पू स्वामी, राजेंद्र सारवडे,पत्रकार संभाजी नागणे ,मल्लिकार्जुन देशमुखे,आदी उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा