maharashtra day, workers day, shivshahi news,

नायगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा भोंगळ कारभार - बेसमेंटमध्ये काळी माती

संबंधित विभागाचे अधिकारी ,जेई. यांची चौकशी करून कारवाई करण्याची उपोषण कर्त्याची मागणी

department of public works corruption, pwd, naigao, naded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर )

              नायगाव येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या परिसरात सुरू असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या करिता बांधण्यात येत असलेल्या प्रकार ४ च्या इमारतीच्या बेसमिटमध्ये ढबर, मुरुम न भरता परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचे पूर्वीचीच काळीमाती बेसमिटमध्ये टाकून वर मुरुमाचा थर देऊन शासनाचे लाखो रुपये हडपणाऱ्या संबंधित अभियंता जीडी.बारसकर कामाचे जेई. ए.एम.सिद्दीकी व गुत्तेदार यांनी संगनमत केले असून योग्य त्या कामाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यासाठी दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी पासून सामाजिक कार्यकर्ते प्रकशभाऊ निवृत्ती हणमंते यांनी उपोषण सुरू केले आहे.

              सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगाव च्या परिसरात सुरू असलेल्या अधिकारी / कर्मचारी याच्या करिता प्रकार चार चे निवस्थानसाठी इमारतीचे बांधकामासाठी शासनाने लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला मात्र संबंधित विभागाचे अधिकारी ,जेई.व गुत्तेदार यांच्या मनमानी कारभाराने कळस गाठला असल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रकशभाऊ हणमंते यांनी बांधकाम परिसरात सुरू असलेल्या प्रकार चार इमारत बांधकामावरील बेसमिटमध्ये ढबर भरण्या ऐवजी जेसीबीच्या साहायाने काळी माती टाकून त्याच काळ्या मातीवर मुरूमाचा थर देऊन शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांचा निधी हडप करणारे संबंधित विभागाचे अधीकारी ,जे.ई. व गुत्तेदार यांची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल करून बोगस सुरू असलेले बांधकाम थांबवावे असे सामाजिक कार्यकर्ते प्रकशभाऊ निवृत्ती हणमंते यांनी दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी पासून आमरण उपोषणास बसलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !