पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई यांचेकडून सर्वोत्कृष्ठ अपराधसिद्धी या पुरस्काराने झाला आहे सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा ( राज सारवडे )
मंगळवेढ्याचे सुपूत्र व सध्या ठाणे येथे कार्यरत असलेले डी वाय एस पी श्री किसन गवळी यांनी संत दामाजी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाला सदिच्छा भेट दिली आपले कर्तव्य बजावत असताना केलेल्या उत्कृष्ट सेवेबध्द्ल पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई यांचेकडून ''सर्वोत्कृष्ठ अपराधसिध्दी'' या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.
माहे जानेवारी २०२२ ते जून २०२२ या कालावधीतील एकूण ज्या पंधरा गुन्हयांची उकल करण्यास यश मिळाले अशा गुन्हयांची अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शिफारस केली होती. श्री किसन गवळी यांना मिळालेल्या पुरस्काराबध्द्ल श्री संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक श्री मुरलीधर दत्तू यांचे हस्ते माजी नगरसेवक श्री दत्तात्रय यादव, जनार्धन डोरले, यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला सदरप्रसंगी चिफ अकौंटंट श्री रमेश गणेशकर, कार्यालयीन अधिक्षक श्री दगडु फटे, सुरक्षा अधिकारी श्री लक्ष्मण बेदरे, अशोक उन्हाळे, आप्पा लेंडवे व कर्मचारी उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा