दामाजी कारखान्याच्या वतीने नवनिर्वाचित गाव कारभाऱ्यांचा सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा ( राज सारवडे )
मंगळवेढा तालुक्यातील चर्चेत असलेल्या फटेवाडी ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणुक झालेनंतर प्रशांत परिचारक व भगिरथ भालके यांचे आमंत्रणावरुन पंढरपुर - सरकोली येथे सत्कार स्विकारुन परतीचे प्रवासात नुतन सरपंच सौ सिमा प्रकाश काळुंगे,नु तन उपसरपंच सौ पल्लवी दिगंबर शिंदे नुतन सदस्य श्री देवराज इंगोले,दत्तात्रय थोरवत, सचिन आवताडे, पैगंबर बारगीर, सुरेश मोटे, संभाजी चव्हाण यांनी श्री संत दामाजी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली कारखान्याचे संचालक श्री औदुंबर वाडदेकर व श्री रावसाहेब फटे यांनी समविचारी आघाडी करुन सदर निवडणुक बिनविरोध करुन मागील परंपरा कायम ठेवली आहे सदर प्रसंगी फटेवाडी येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ श्री प्रकाश काळुंगे, सिद्राम शिंदे, मारुती लेंडवे, सचिन लेंडवे,संभाजी इंगोले, शिवाजी आवताडे, दिगंबर शिंदे, संजय फटे, पत्रकार संभाजी नागणे उपस्थित होते
वरीलप्रमाणे सर्व मान्यवरांना कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी, कार्यालय अधिक्षक-दगडु फटे यांनी मायेची शाल, सन्मानाचा फेटा, पुष्पहार व श्रीफळ देवुन सन्मानित केले तसेच फटेवाडी गांवचा सर्वांगीण विकास करणेकरिता शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी कारखान्याचे वाहन विभागप्रमुख इसाक कोरबु, कवी अशोक उन्हाळे, दादासाहेब बिराजदार, परचेस ऑफिसर संदीप इंगोले, अकबर इनामदार, चिदानंद कुंभार कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा