maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार : दिलीप धोत्रे

पंढरपूर अर्बन बँकेला प्रशांत परिचारकांनी राजकारणाचा अड्डा केला - विरोधकांचा आरोप

pandharpur bank, election, prashant paricharak, dilip dhotre, mns, bjp, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. पंढरपूर या बँकेची निवडणूक जाहीर झाली असून सदरची निवडणूक ही पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी आघाडीच्या वतीने लढवणार असल्याचे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

अनेक वर्षांपासून परिचारक घराण्याची सत्ता असलेली पंढरपूर अर्बन ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. बँकेचे सभासद ३३,७०६ असून दि.२१ ते २७ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज भरण्यात येणार असून २८ डिसेंबर रोजी छाननी होणार आहे. १२ जानेवारी २०२३ रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतीम मुदत आहे. यासाठीचे मतदान २२ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

याबाबत पंढरपूर येथे पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की अनेक वर्षांपासून परिचारक घराण्याची सत्ता असलेल्या बँकेचा कारभार आमदार प्रशांत परिचारक यांच्या मनमानीने सुरु असून कार्यकर्त्यांना तसेच राजकारण्यांना मोठ्या स्वरूपांचे कर्ज देत असल्याने बँक रसा तळाला गेली असल्याचा आरोप केला आहे.

 

याचबरोबर अनेक वर्षांपासून सभासदांनाही लाभांश दिला गेला नाही. सभासदांना कोणत्याही स्वरूपाचे कर्ज दिले जात नाही. राजकारण्यांचा पाहुणचार करण्यासाठी बँकेकडून भरम साठ खर्च केला जात आहे. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीवर घेतले जात नसल्याने कामगाराची पिळवणूक केली जात आहे. पंढरपूर अर्बन बँक वाचवण्यासाठी आपण पंढरपूर अर्बन बँक बचाव समविचारी आघाडी कडून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !