कन्नड तालुक्यातील घटना - पिशोर ठाण्यात गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड ( मिलिंद कुमार लांडगे )
कन्नड तालुक्यातील नागपुर येथे मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका मंदिरातील दानपेटी पळवली तसेच दोन घरे फोडून आतील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली नागपुरात मध्यरात्री सोलकर्णी गावातील पूर्णेश्वर मंदिरात प्रवेश करून आतील दानपेटी उचलून गावाबाहेर आणली त्यानंतर त्यातील रोख रक्कम काढून घेत दानपेटी तेथेच टाकून दिली तसेच चोरट्याने गावातील भीमराव सोनवणे हे पत्नीसह चौका येथे लग्नाला गेले होते
त्यांच्या मुलाला गाढ झोप लागल्याने चोरट्याने त्यांच्या घराच्या कडीजवळील पत्र कापून आत प्रवेश करीत कपाटातून एक तोळा सोन्याची झुंबर दोन ग्रॅम नथ चांदीची दागिने व रोख दहा हजार रुपये असा जवळपास एक लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला त्यानंतर याच भागातील हिरो दिन जबर खान यांचे कुटुंबीय घरी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला काही ही सापडले नसल्याने त्यांच्या घरातील साहित्याची चोरट्यांनी तोडफोड केली ही बाब निदर्शनास आली.
श्वान घुटमळले
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा