उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्याकडून सर्व गावांची पाहणी
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा ( राज सारवडे )
मंगळवेढा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी आज रविवारी १८ डिसेंबर रोजी मतदान होत असून, ६० मतदान टीमचे प्रस्थान तहसील कार्यालयातून ५० मतदान केंद्रांवर झाले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी मारापूर, येद्राव, गोणेवाडी या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बुथवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
संवेदनशील केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीला उभे असलेल्या त्या उमेदवारांचे निर्धारित केलेले प्रतिनिधी यांनाच मतदान केंद्रात जाण्याची संधी मिळेल.
इतरांना त्या ठिकाणी थांबू दिले जाणार नाही. शाळेच्या प्रवेशद्वारावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजितसिंह माने यांनी दिली.
१६ गावांतील मतदान केंद्रांवर लाईट फिटिंग, पाण्याची सोय, विद्युतपुरवठा, दिव्यांगांसाठी रॅम्पची सोय आहे की, नाही याची प्रत्यक्ष पाहणी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केली आहे.
निवडणूक होत असलेल्या १६ गावांत डीवायएसपी राजश्री पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामपंचायत निवडणूक शांततेत कशी पार पडेल. याची पाहणी केली.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा