maharashtra day, workers day, shivshahi news,

तरुणांनी एसटी बस मध्ये चढून कॉलेजला जाणाऱ्या मुलींची काढली छेड

सहा तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Young men tease girls, msrtc, bus, khandavi, jalgao, jamod, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, जळगाव

जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी बस स्टॉप वर काल, १६ डिसेंबरच्या संध्याकाळी चांगलाच राडा झाला. खांडवी येथील ६ तरुणांनी एसटी बसमध्ये चढून मुलींची छेड काढली, एवढेच नव्हे तर मुलींना मारहाणही केली. मुली जळगाव जामोद येथील एस के. के कॉलेज मध्ये शिकतात. त्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथून एसटी बसणे जाणे येणे करतात. दरम्यान मुलीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी खांडवी येथील ६ जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथून काही मुली व मुले जळगाव जामोद येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जळगाव जामोद बस डेपोच्या वतीने जळगाव जामोद ते वडोदा अशी बस सेवा सुरू केली आहे. दरम्यान काल, सायंकाळी वडोदा येथील मुली आणि मुले बस मध्ये बसून वडोदा येथे जात होते. बस खांडवी स्टॉपवर थांबली असता तेथील ६ तरुण गाडीत चढले. त्या ६ जणांनी वडोदा येथील धनेश सुनील फुसे याला मारहाण करायला सुरुवात केली, त्याचवेळी गाडीत बसलेल्या वडोदा गावच्या मुलींनी त्या ६ जणांना हटकले असता, त्या ६ जणांनी मोर्चा मुलींकडे वळवला. मुलींची छेड काढली, त्यांचे केस व ओढण्या ओढल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून खांडवी येथील विशाल डोंगरदिवे, अजय डोंगरदिवे, रोशन पंढरी डोंगरदिवे, विकास साहेबराव डोंगरदिवे याच्यासह दोन अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


मुलींना सातत्याने होतोय त्रास
दरम्यान या मुलींना टवाळखोर मुले सातत्याने त्रास देत असल्याचे समोर येत आहे. काही मुले कारण नसतांना त्या एसटी बसने प्रवास करतात असेही सांगण्यात येत आहे. जळगाव जामोद बस स्टँड वर सायंकाळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज असल्याची मागणी जोर धरत आहे. '

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !