पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडेन - मावळते तालुकाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर )
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नायगाव तालुकाध्यक्षपदी निवड झालेले नवनियुक्त तालुकाध्यक्ष संजय बेळगे यांचा नायगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न झाला असून माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते बेळगे यांना तालुकाध्यक्ष पदाचा पदभार देऊन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी अनेकांची उपस्थिती होती
नायगाव तालुक्याच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी नुकतेच निवड झालेले संजय बेळगे यांचा पदग्रहण सोहळा व अभिनंदनाचा कार्यक्रम दि.११ डिसेंबर २०२२ रोजी नायगाव येथे माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण हे होते तर व्यासपीठावर केशवराव पाटील चव्हाण,माजी तालुकाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे,मोहन पाटील धुप्पेकर,बाबुराव पाटील अडकीने,मिनाक्षी ताई कागडे,हनमंतराव पाटील चव्हाण,माधव अप्पा बेळगे,श्रीनिवास पाटील चव्हाण,विजय पाटील चव्हाण,रविंद्र पाटील चव्हाण,पंकज पाटील चव्हाण,संजय पाटील शेळगावकर,विधानसभा अध्यक्ष बापुसाहेब पाटील कौडगावकर, प्राचार्य मनोहर पवार, सय्यद रहीम सेठ, डॉ.शिवाजी कागडे यासह अनेकांची उपस्थिती होती
यावेळी माजी आ.वसंतराव पाटील चव्हाण म्हणाले की, नेत्याला पुढे जाण्यासाठी सक्षम कार्यकर्त्यांची गरज असते भविष्यात काँग्रेस पक्षाला मोठे करण्यासाठी किंवा आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सक्षम असलेले संजय बेडगे हे तालुका अध्यक्ष पदांची धुरा खांद्यावर घेऊन पक्ष वाढीसाठी निष्ठेने काम करतील असा विश्वास यावेळी आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी, नारायण जाधव,सुधाकर पाटील शिंदे,रविंद्र भालेराव,पंढरी भालेराव,दयानंद भालेराव,संगनवार सावकार,पांडूरंग पाटील चव्हाण,शरद भालेराव,सय्यद ईशाखभाई नरसीकर,माणिक पाटील चव्हाण,संजय पाटील चव्हाण,माधवराव कंधारे, अनिल कांबळे,अयुब शेख,जब्बार खान यासह मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
मागील तालुकाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करताना मी अत्यंत समाधानी असून येणाऱ्या काळात पक्षाने माझ्यावर जो जिम्मेदारी देईल ते मी प्रामाणिकपणे पार पाडेन मावळते तालुकाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांनी मत व्यक्त करुन नवनिर्वाचित तालुकाध्यक्षाना भरभरून शुभेच्छा दिल्या.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा