रितेश - जेनेलियाच्या ' बेसुरी ' नं लावलं वेड
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सध्या त्यांच्या आगामी ' वेड ' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा रितेश व जेनेलिया साठी सर्वार्थाने खास आहे. याचं कारण म्हणजे, या चित्रपटात्वारे रितेश दिग्दर्शक क्षेत्रात पदार्पण करतोय आणि जेनेलिया या सिनेमाच्या माध्यमातून जेनिलिया मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. नुकताच या सिनेमातील ' बेसुरी 'हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. आणि या गाण्यानं चाहत्यांना जणू वेड लावलं. ' वेड 'या सिनेमाचा पोस्टर, टीचर आणि टायटल सॉंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. यानंतर ' वेड 'सिनेमातील ' बेसुरी ' हे गाणं रिलीज झालं आणि या सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा